जळगाव प्रतिनिधी । शहरातील विजय वाईन्स दुकानावर दारू खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. आज दारूची दुकान उघडण्यापुर्वी मद्यप्रेमींनी दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्या. परिणामी फिजीकल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला. जळगावात अनियंत्रित गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा तसेच आस्थापनांसह इतर काही दुकानांनाही सुरू करण्याची परवानगी दिली मिळाली. यात मद्यविक्रीच्या दुकानांचाही समावेश होता. शासन आदेशानुसार जळगावातही मद्य व्यावसायिकांनी आज वाईन्स दुकाने सुरू केली. पहिल्याच दिवशी मद्यप्रेमींची दुकानासमोर प्रचंड गर्दी झाली होती. शासनाच्या आदेशानुसार वाईन्स शॉप दुकानदारांनी आदल्या दिवशी बॅरेगट्स आणि पांढरे पट्टे मारण्यात आले होते. तब्बल ४५ दिवसांनंतर दुकाने उघडल्याने मद्य खरेदीसाठी अक्षरशा मद्यप्रेमींच्या शहरातील सर्वच मद्यविक्रिच्या दुकानांसमोर सोशल डिस्टन्सिंगचा नियम ढाब्यावर ठेवून मोठ्या रांगा लागल्या होत्या.