सलार नगर आणि अक्सा नगरातून कारची चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अक्सा नगर आणि सलार नगर या भागातून अज्ञात तीन चोरट्यांनी दुचाकीवर येवून एकाने कारचा दरवाजा उघडून कारची चोरी केल्याची घटना आज भल्या पहाटे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, कार चोरतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. 

अधिक माहिती अशी की, अक्सा नगरातील रहिवाशी अकील शाकीर सय्यद यांनी देखील त्यांच्या मालकीची सॅन्ट्रो (एमएच ०२, एमए ४०१७) क्रमांकाची कार घरा समोर पार्किंगला लावली होती. मध्यरात्री २ वाजून ३५ मिनीटाला एका दुचाकीवर तीन आले. दुचाकी बाजूला लावून तिघे कारची चोरी करून पसार झाले. तर दुसऱ्या घटनेत शहरातील सलार नगरातील रहिवाशी युनुस युसूफ मुजावर यांची मालकीची (एमएच २० सीएच ८७८६) कार तवेरा आहे. आज रविवारी पहाटे ४.२९ वाजेच्या सुमारास अज्ञात तीन चोरटे दोन दुचाकीने सलार नगरात आले. अवघ्या दोन मिनीटात युनुस मुजावर यांच्या घरासमोर लावलेले तवेरा कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या दोन्ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

Protected Content