जळगावातील जैन मंदिरात पितळी भांड्यांची चोरी; संशयित सीसीटीव्हीत कैद

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगरातील श्री महावीर डिंगबर जैन मदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी लॉक तोडून ५० ते ५५ हजार रूपयांचे पितळी भांडे असा ५० ते ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, बुधवारी दुपारी दरवाजाचे लॉक तोडून अज्ञात चोरटयांनी पितळी भांडे लांबविले. त्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर चोरटयांनी याच ठिकाणी उर्वरित पितळी भांडे सुमारे ५० ते ५५ हजार रूपयांचा मुददेमाल लांबविला. ही घटना शहरातील शिवाजीनगरातील श्री महावीर डिंगबर जिन चैत्यालय ट्रस्ट मंदिरात घडली. गुरूवारी सकाळी पुजारी मंदिरात आल्यावर प्रकार उघडकीस आला. बुधवारी दुपारी या मंदिराचे लॉक तोडून काही पितळी भांडे घेऊन पलायन केले होते. परंतु हा प्रकार लक्षात आला नाही. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री या मंदिरात चोरटयांनी पुन्हा एन्ट्री करून अन्य पितळी भांडे घेऊन पोबारा केला. आज सकाळी प्रमोद पुजारी मंदिरात आले असता सामान अस्तव्यस्त केलेला दिसला. तर भांडे गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला. घटना कळताच मंदिराचे ट्रस्टी प्रदिपकुमार सुरेंद्रनाथ जैन यांनी याठिकाणी धाव घेत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

प्रदिपकुमार जैन यांनी परिसरातील फुटेज तपासले असता बुधवारी दोन इसम मंदिर परिसरात वावरत असल्याचे दिसून आले. तर मध्यरात्री मंदिराजवळ तीन संशयीत इसम फिरत असताना दिसून आले. सदर फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या पूर्वी या मंदिरात तीन वेळा चोरी झाल्याची माहिती प्रदिपकुमार यांनी दिली.

Protected Content