नवी दिल्ली वृत्तसंस्था । जळगावहून पुणे आणि इंदूर विमान सेवेबद्दल दिल्लीत खासदार उन्मेष पाटील यांनी अलायन्स एअर कम्पनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांशी चर्चा केली
जळगाव विमानतळावरून नियमितपणे अहमदाबाद व मुंबई विमानसेवा सुरू आहे. नाईट लँडिंग सुविधेसह सज्ज असलेल्या जळगाव विमानतळावरून पुणे व इंदौर विमानसेवा सुरू व्हावी.यासाठी ९ फेब्रुवारीरोजी दिल्ली येथे जळगाव विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष खासदार उन्मेश पाटील यांनी अलायन्स एअरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती हरप्रीत .सिंह तसेच मार्केटिंग हेड मनू आनंद यांची भेट घेतली.
या मार्गावर अलायन्स एअर कंपनीने आर सी एस उडान स्कीम या केंद्र शासनाच्या योजना अंतर्गत विमान सेवा सुरू करण्याविषयी सखोल चर्चा केली. अजिंठा लेणी जवळ असलेल्या जळगाव शहरात वाढलेला व्यापार, पर्यटन, उद्योगामुळे येथून मोठ्या प्रमाणात या विमानसेवेस अपेक्षित प्रवाशी मिळणार असल्याचा विश्वास खासदार उन्मेश दादा पाटील यांनी यावेळी दिला.