जळगाव प्रतिनिधी ।तालुक्यातील जळके व वसंतवाडी येथील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजनाचा सोहळा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यात जळके व वसंतवाडी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाचा समावेश असून यामुळे परिसरातील हजारो नागरिकांची सोय होणार आहे. तर या कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी वसंतवाडी गावाच्या पाणीपुरवठा योजनेसह अन्य सर्व कामे लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती दिली.
याबाबत वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील जळके आणि वसंतवाडी येथील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजनाचा सोहळा आज सायंकाळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पं. स. सभापती नंदलाल पाटील हे होते.
याप्रसंगी जळके गावाच्या प्रवेशद्वार जवळील 90 लक्ष निधीतून बांधलेल्या पुलाचे लोकार्पण, वसंतवाडी येथे सभामंडपाचे भूमिपूजन, जळके व वसंतवाडी व विटनेर येथील राष्ट्रीय कुटुंब लाभार्थींना प्रत्येकी 20 हजाराचा धनादेश वाटप व अंगणवाडी इमारत बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष बाब म्हणजे आजच्या कार्यक्रमात जळके व वसंतवाडी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. या पुलामुळे दोन्ही गावांसह परिसरातील हजारो नागरिकांची सुविधा होणार आहे. अतिशय सुसज्ज असा हा पूल 90 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून जळके व वसंतवाडी गावाला जोडणाऱ्या पुलाचे लोकांची सोय होणार असल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न प्रलंबित असून आता याचे निराकरण करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान वसंतवाडी येथील पाणीपुरवठा योजनेला लवकरच मान्यता मिळणार असून याचे भूमिपूजन करण्यासाठी आपण लवकरच येथे येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. तर ट्रांसफार्मर सह अन्य समस्यांची पूर्तता देखील लवकर करण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार पाटील यांनी याप्रसंगी दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी पं. स.चे सभापती नंदलाल पाटील, बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, उपसभापती संगीता चिंचोरे, जि.प. सदस्य पवन सोनवणे, पं .स. सदस्य निर्मलाबाई कोळी, माजी सभापती चंद्रशेखर आण्णा पाटील , र वि.का.सोसायटीचे चेअरमन रमेशअप्पा पाटील, संचालक पि.के.पाटील , सरपंच वत्सलाबाई पाटील, सुमनबाई मोरे, सा.बा. सहायक अभियंता श्रेणी 1 चे सुभाष राऊत, शाखा अभियंता जे. के. महाजन, अभियांत्रिकेचे आर.जी. बेडिस्कर, उपसरपंच अनिता चिमनकारे, तंटामुक्तिचे ज्ञानेश्वर चव्हाण, शाखा प्रमुख कविश्वेर पाटील, प्रविण पाटील, चावदास कोळी, अर्जुन पाटील, सुरेश गोलांडे,सचिन पाटील, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.