जिल्ह्यात आज १२७ रूग्ण कोरोना बाधित; २३७ रूग्ण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात १२७ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. तर जिल्ह्यातून आज २३७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यातील पाचोरा, धरणगाव, एरंडोल, मुक्ताईनगर तालुक्यातील रूग्ण संख्या निरंक दिसून येत आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर – २९, जळगाव ग्रामीणी-१, भुसावळ -१७, अमळनेर-५, चोपडा-१४, भडगाव-४, पाचोरा-०, धरणगाव-०, यावल-५, एरंडोल-०, जामनेर-४०, रावेर -३, पारोळा-३, चाळीसगाव-५, मुक्ताईनगर-०, बोदवड-१, इतर जिल्हे-० असे एकुण १२७ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकुण रूग्ण संख्या ५२ हजार ५१२ कोरोना बाधित झाले आहे. त्यापैकी ४९ हजार ८१६ रूग्ण कोरोनामुक्त झाली असून १ हजार ४४७ रूग्ण उपचार घेत आहे. आज दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. एकुण मृतांचा आकडा १ हजार २५२ वर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासने दिली आहे.

Protected Content