जलाराम सत्संग मंडळास इनरव्हीलतर्फे रोटी मशीन भेट

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील जलाराम सत्संग मंडळास इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या वतीने स्वयंचलित रोटी मशीन दिली भेट देण्यत आली.

 

मागील १९ वर्षापासून जलाराम सत्संग मंडळातर्फे गोर गरिबांना अन्नदान करण्यात येत आहे. या मंडळातर्फे दररोज २५० ते ३०० लोकांना अन्नदान करण्यात येते. गुजरात येथील वीरपुर येथे २१० वर्षापासून जलाराम बापाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या निरंतर भंडारातून प्रेरणा घेऊन जलाराम रामरोटी अन्नदान उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचा लाभ मोठ्या प्रमाणात गरजूंना मिळावा या उद्दात हेतून इनरव्हील क्लब ऑफ जळगावतर्फे मंडळास स्वयंचलित रोटी मशीन भेट देण्यात आली आहे. जगदीश मंदोराजी अन्नदानाचा उपक्रम यशस्वीपणे चालवीत आहेत. दरम्यान रोटी मशीन भेट उपक्रमास इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टसह दिशा प्रकाशभाई गुजराथी यांनी आर्थिक मदत केली आहे.  या उपक्रमासाठी पंकजभाई शेठ यांनी खूप मेहनत घेतली आहे.याप्रसंगी क्लबच्या अध्यक्ष नीता परमार, दीपा टिब्रेवाला, मीनल लाठी, मंडोरा, कीर्ती काबरा, सुलभा लढ्ढा उपस्थित होत्या.

Protected Content