जलचक्र येथून पानबुडी व केबलची चोरी; बोदवड पोलीसात गुन्हा

बोदवड प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील जलचक्र शेतशिवारातून अज्ञात चोरट्यांनी शेतातील १४ हजार रूपये किंमतीची पानबुडी मोटार आणि केबल चोरून नेल्याची घटना ३० डिसेंबर रोजी उघडकीला आली. बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला..

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जलचक्र शेत शिवारातील अशोक देवीदास जडे रा. बोदवड यांच्या शेतात बोदवड पंचायत समितीकडून अनुदान तत्वावर पानबुडी व केबल लावण्यात आले होते. सध्या शेतात काम नसल्यामुळे पानबुडी शेतात ठेवली होती. २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १४ हजार रूपये किंमतीचे पानबुडी आणि केबल चोरून नेल्याचे उघडकीला आले. जगन राऊत यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कालीचरण बिऱ्हाडे करीत आहे.

Protected Content