बुलडाणा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | – जिल्ह्यातील जलंब येथे अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या पथकाकडून अवैध दारू संदर्भात मोठी कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात आगामी दोन-तीन दिवसानंतर होळीचा सण असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू तयार करून विक्रीसाठी जाणार असल्याचे खात्रीलायक गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या निर्देशानुसार पोलीस पथकाला आदेशित करून धाड टाकण्यात आली. या पथकाने पहूरजिरा , मोरगाव रस्त्यावर सापळा रचून ऑटो क्रमांक एम एच 28 टी १०७४ क्रमांकाच्या वाहनात देशी दारूचे १६ बॉक्सची अंदाजे किमत ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल एक लाख रुपये किमतीचा आटो, व मोबाईल असा एकूण १ लाख ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल परमेश्वर श्रीकृष्ण लाहुळकार रा. पारखेड संशयित आरोपीकडून जप्त करण्यात आला. यासंदर्भात जलंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या देशी दारू प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता आहे. पुढील तपास जलंब पोलीस करीत असून या कारवाईत पो.हे.का गजानन बोरसे, ना.पो.का. गजानन आहेर, संदीप टाकसाळ यांच्या पथकाने भाग घेतला