शेतातून केळीचे घड चोरणाऱ्या महिलेला पकडले

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव शिवारातील शेतकऱ्याच्या शेतातून केळीचे घड तीनजण चोरून नेतांना दिसून आले. यातील एका महिलेला पकडले असून मुक्ताईनगर पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नायगाव शिवारात सुभाष तुकडून बेलदार (वय-४९) रा. कोठा ता. मुक्ताईनगर यांचे शेत गट क्रमांक १५१ मध्ये शेत आहे. सुभाष बेलदार यांनी शेतात केळीची लागवड केली आहे. २६ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास सुभाष बेलदार हे शेतात आले असता त्यांना त्यांच्या शेतातील केळी बागामधून तीनजण केळीचे घड कापूर नेतांना दिसून आले. त्यांना हटकले असता यातील एक महिला आणि एक पुरूष केळीचे घड सोडून पसार झाले व एका महिलेला पकडले. शेतकऱ्यांनी महिलेला पोलीसांच्या स्वाधिन केले आहे. याबाबत पोलीसांनी चौकशी केली असता भारती राहूल वाघ, लिला भास्कर पोहेकर आणि राहूल राघो वाघ सर्व रा. नायगाव ता. मुक्ताईनगर अशी नावे समोर आली आहे. शेतकरी सुभाष बेलदार यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश महाजन करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.