जय श्री श्यामच्या गजरात निघाली प्रथम श्री खाटू श्याम बाबांची निशाण पद यात्रा

 

शेगाव, प्रतिनधी । हारे का सहारा श्याम बाबा हमारा, लखदातार की जय,जय श्री श्याम असा जयघोष करीत शेगाव येथील श्याम प्रेमी द्वारा शेगांव ते खामगांव प्रथम निशाण पद यात्रा धार्मिक व मंगलमय वातावरणात काढण्यात आली.

राजस्थान नगरीतील विश्व विख्यात श्री श्याम नरेश यांचा जन्मोत्सव देशभरात श्याम भक्ताकडून धार्मिक उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. या वर्षी पहिल्यांदाच खाटू श्याम प्रेमी भक्त परिवार, शेगांवतर्फे खाटू श्याम नरेश जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने असलेले शाम भक्त या काळात धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहतात मात्र यावर्षी कोरोना प्रादुर्भावाचा प्रसार होऊ नये याकरिता श्याम बाबा भक्त परिवारातर्फे अत्यंत साध्या पद्धतीने हा धार्मिक उत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

शेगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या रोकडिया हनुमान मंदिरात निशानचे व हनुमानाचे पूजन करून निशाण यात्रेचा प्रारंभ झाला. या निशान यात्रेत मनोज वर्मा, सौ किरण वर्मा, योगेश अग्रवाल ,सौ दिपाली अग्रवाल, अमित अग्रवाल, कार्तिक वर्मा, अमर सिकरिया, दीपक अग्रवाल, विशाल अग्रवाल, सौ. मीरा धानुका, श्रीमती रेखा धानुका, सौ. मीना अग्रवाल जगदीश अग्रवाल जितेंद्र अग्रवाल , मयूर वर्मा,शिक्षण महर्षि रामविजय बूरूगले यांच्यासह अनेक श्याम भक्तांच्या उपस्थितीमध्ये नरेश निशान पदयात्रा काढण्यात आली! या निशाण यात्रेचे खामगाव शेगाव सतरा किलोमीटरच्या महामार्गावर विविध ठिकानी दिपक सलामपुरिया शेगांव,श्री खाटुश्याम परीवार शेगांव, गोविंद पुरोहित, खामगांव, विनोद अग्रवाल खामगांव यांनी निशानचे पूजन करुन पद यात्रेचे स्वागत केले.

जय श्री श्याम, हारे का सहारा श्याम बाबा हमारा, खाटू श्याम नरेश की जय आदी जय घोषात पैदल वारी करीत निशांत पदयात्रा श्री श्याम मंदिर खामगांव येथे पोहचताच परिसरातील श्याम भक्तांनी पुष्पवर्षाव करून स्वागत केले.

Protected Content