नवी दिल्ली- वृत्तसंस्था । आशियाई क्रिकेट परिषदेवर आता भारताचे वर्चस्व असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
जय शहा यांनी नजमुल हसन यांची जागा घेतली. बीसीसीआय सचिव जय शहा यांची एकमताने आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शहा बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजमुल हसन पापोन यांची जागा घेतील.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण सिंह धुमल यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली. धूमल यांनी लिहिले की, ‘जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. मला खात्री आहे की एसीसी तुमच्या नेतृत्वाखाली नवीन उंची गाठेल आणि संपूर्ण आशियाई प्रदेशातील क्रिकेटपटूंना याचा फायदा होईल. यशस्वी कालावधीसाठी माझ्या शुभेच्छा.
आशिया करंडक स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी एसीसीची आहे. कोविड-१९ साथीमुळे २०२० मध्ये आशिया करंडक यावर्षी जूनपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. सुरुवातीला पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद होते, पण आता श्रीलंका किंवा बांगलादेशात होऊ शकते.