जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या विरोधात जामनेरात राष्ट्रवादीचे आंदोलन

 

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नागपूर अधिवेशनामध्ये निलंबन करण्यात आल्याने त्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शुक्रवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता शहरातील नगरपालिका चौकात भाजप व शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.

अधिवेशनामध्ये सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. याचे कारण भाजप शिंदे सरकार हे खोटे बिलपास करण्यासाठी विरोधकावर दबाव टाकत असून सर्वांचा आवाज दाबण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. कारण शिंदे सरकार हे मोठ्या प्रमाणावर जमीन घोटाळ्यात अडकले असून ते बाहेर येऊ नये, त्यामुळे जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षांनी सांगितले की, जर तुम्ही जयंत पाटील यांच्यावर कारवाई करता तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत अपशब्द बोलणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे काय त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी यावेळी बोलताना केली. जर येणाऱ्या काळात जयंत पाटील यांचं निलंबन मागे घेतले गेले नाही, तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना दिला.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, राष्ट्रवादी नेते संजय गरुड, तालुकाध्यक्ष विलास राजपूत, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष संदीप हिवाळे, विनोद माळी, हिम्मत राजपूत, संतोष झाल्टे, माधव चव्हाण, प्रभू झाल्टे, मोहन चौधरी, अनिस पैलवान, सचिन बोरसे, एहफाझ मुल्लाजी यांच्यासह राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content