जगत प्रकाशदास महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

 

फैजपूर ( ता यावल ) : प्रतिनिधी ।  जागृत हनुमान मंदिर हनुमानगड सोना सावखेडा येथील गादीपती शास्त्री जगत प्रकाशदास महाराज यांच्या 54 व्या  वाढदिवसानिमित्त परिसरात मान्यवरांच्या हस्ते पाचशे रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले

 

या वृक्षांच्या संगोपनासाठी ठिबक सिंचन करण्यात येत असून ही जबाबदारी देवस्थानतर्फे स्वीकारण्यात आलेली आहे या छोटेखानी सोहळ्यात उपस्थित संत महंतांनी व  मान्यवरांनी  महाराजांना माल्यार्पण व पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले

 

या देवस्थानाचा उतारा नोंद करण्यासाठी महसूल व भूमापन कार्यालय तसेच बामनोद ग्रामपंचायत यांच्याकडे सातत्याने प्रयत्न  आमदार शिरीष चौधरी, जि प सदस्य प्रभाकर सोनवणे, प्रांताधिकारी कैलास कडलक, तहसीलदार महेंद्र पवार यांनी केले . यावेळी हा देवस्थानाचा खाते उतारा नोंदीचा दाखला महाराज यांना सुपूर्द करण्यात आला

याप्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज ( फैजपूर ), गोपाल चैतन्य महाराज ( पाल ), स्वरूपानंद महाराज  ,शास्त्री भक्ती स्वरूपदास , शास्त्री विश्व प्रकाशदास ,ह.भ.प. दगडू महाराज (बामनोद ) आदी  संत-महंत व्यासपीठावर उपस्थित होते

प्रमुख मान्यवरांमध्ये भुसावळचे  नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे , माजी जिप सदस्य भरत महाजन, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते ,जळगावच्या  माजी महापौर आशा कोल्हे, सिंधू कोल्हे ,भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, निलेश राणे ,पांडुरंग सराफ, भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी , बामणोदचे  सरपंच राहुल तायडे, भुसावळच्या  ज्येष्ठ नागरिक  संघाचे अध्यक्ष विसपुतेकाका व  भाविक उपस्थित होते

 

प्रास्ताविक व सूत्रसंचालन भक्ती किशोरदास यांनी केले  आभार पप्पू चौधरी यांनी  मानले  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  नितीन झांबरे , बबलू महाजन, नितीन पाटील, गिरीश भगत , दीपक भगत, गिरीश पाटील, लोकेश महाजन आदींनी  परिश्रम घेतले

 

Protected Content