जळगाव, प्रतिनिधी | छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या विटंबनेचा जाहीर निषेध आणि दोषींवर कठोर कारवाई अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान जळगावतर्फे करण्यात आली आहे.
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान जळगावतर्फे शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर कर्नाटक राज्यातील बंगळरू येथे समाजकंटकांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विटंबना करण्यात आले. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी गजानन माळी यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले की, दि. १७ डिसेंबर रोजी कर्नाटकाची राजधानी बंगळुरू येथे सदाशिवनगर भागात काही अज्ञात व्यक्तींनी संपूर्ण देशाचे आराध्य छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीची विटंबना करण्याची नीच विकृती केली. त्यांच्या या कृतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. ज्या विकृतीने हे घाणेरडे धर्मद्रोही कृत्य केले तो राष्ट्रीय काँग्रेस चा कार्यकर्ता आहे. तसेच तो कर्नाटक मधील कन्नड रक्षण वेदिका समितीचा देखील कार्यकर्ता आहे.तरी कर्नाटक प्रशासनाने राजकारण विरहित या प्रकरणाची शहानिशा करून जे कोणी यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी. श्री शिवाजी महाराज हे समस्त हिंदूंचे आराध्य दैवत आहेत. केवळ राजकीय किंवा प्रांतीय लोभापोटी त्यांच्या मूर्तीची विटंबना करणे हे निश्चितच निषेधार्ह आहे. या कारवाईला जसा जसा उशीर होत आहे तसे महाराष्ट्रात कन्नड लोकांविरुद्ध रोषाचे वातावरण होत आहे. शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीत नक्कीच या घटनेविरोधात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक प्रशासनावर दबाव आणून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची विनंती आम्ही श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाला करत करण्यात आली आहे. याप्रसंगी गजानन माळी, अशोक शिंदे, कृष्णा पवळ, सतोष पाटील, कृष्णा पाणसंबाळ, मोहन पाटील, समाधान कोळी, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/977077369549632