खुनातील संशयिताचा व्हिडीओ टीकटॉकवर व्हायरल करणे पडले महागात; चौघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात असलेल्या संशयित आरोपीचे टीकटॉकवर व्हिडीओ व्हायरल करणे चांगलेच महागात पडले. याबाबत बातमी वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर एलसीबीने चौकशी करून १२ जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल केला. यातील चौघांना अटक केली असून यात एक अल्पवयीन बालकाचा समावेश आहे.

यांनी केली अटक
अरुण नाना सोनवणे (मराठे, वय २२, रा.रामेश्वर कॉलनी), आनंद हरी पाटील (वय १८, रा.खेडी, ता.जळगाव) व दीपक रमेश हटकर (वय २२, इंदिरानगर, खेडी, ता.जळगाव) व एक अल्पवयीन बालकास अटक केली आहे. अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.

काय आहे हे प्रकरण?

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अमोल मराठे असे या संशयिताचे नाव आहे. अमोल याने सप्टेबर २०१९ मध्ये खेडी गावात राहणाऱ्या बिपीन मोरे यांचा चाकुने भोसकुन खुन केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याला अटक केली असून तो सध्या कारागृहात आहे. आता त्याचे कारागृहातील छायाचित्र, न्यायालयात हजर करतानाचे व्हिडीओ मित्रांनी काढले आहेत. चक्क टीकटॉक व्हिडीओ तयार करुन अमोलची मुजोरी, दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. @२९७६५६१९८७६४६ क्रमांकाच्या टीकटॉक युझर आयडीने हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात अमोलच्या फोटोंसह नुकताच सुपरहीट झालेला मुळशी पॅटर्न या चित्रपटातील डॉयलॉक वापरलेले आहेत. प्रवीण तरडे (चित्रपटातील नन्या भाई) यांच्या ‘गुन्हा करायचा तर चार चौघात, लपुन, छपुन भुरटे मारतात भाईलोग नाही’ या डॉयलॉगवर अमोलचे विविध फोटो सेट केले आहेत. तसेच @shubhampatil8355 आणि arunsonavane007 या दोन आयडीवरुन हा व्हिडीओ तयार केल्याचे दिसते आहे. ५९ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये ‘आया है राजा लोगो रे लोगो’ या हिन्दी सिनेगीताचे बोल वापरले आहे. दरम्यान, ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांच्याकडे चौकशी सोपवली होती. रोहोम यांनी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणांची चौकशी केली. यात अमोलचा मोठा भाऊ अरुण सोनवणे याचा जबाब नोंदवण्यात आला. अमोल याने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ स्वत: तयार केला होता. यानंतर शुभम उर्फ कोयता शेख पाटील याच्या नंतर विविध सोशल मिडीयावर व्हारयल केला. न्यायालयाच्या बाहेर अमोल चालत असताना आनंद हरी पाटील या तरुणाने मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग केल्याचीही कबुली अरुण याने दिली.

या १२ जणांवर गुन्हा दाखल
अरूण नाना सोनवणे (मराठे) वय-२२, रा. रामेश्वर कॉलनी, आनंद हरी पाटील वय-१८ रा. खेडी ता.जि.जळगाव, अल्पवयीन विधीसंघर्ष मुलगा, दिपक रमेश हटकर वय-२२ रा. इंदिरा नगर, खेडी ता.जि.जळगाव, ईश्वर अशोक राऊत वय-२१ रा. ममता हॉस्पीटल जवळ, मेहरूण, अरूणाबाई नाना सोनवणे (मराठे) वय-५० रामेश्वर कॉलनी, आकाश कोलते, योगेश घोलप, सुरज नेवे, सुरज सोनवणे, नंदकिशोर सत्यजीत खारे, टीकटॉक आयडी @user29076561987646 धारक या १२ जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात भादवि कलम ५०५ (१)(ब), ५०५ (२), ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विनायक लोकरे तपास करीत आहेत.

यांनी केली कारवाई
पोलिस निरीक्षक बापू रोहोम, पोलिस उपनिरीक्षक अंगत नेमाणे, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, जितेंद्र पाटील, अशरफ शेख, सुधाकर अंभोरे, अनिल देशमुख, दर्शन ढाकणे, महेश पाटील, नितीन चौधरी, महेश महाजन, किरण चौधरी, विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे यांच्या पथकाने या व्हिडीओची चौकशी करुन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Protected Content