जळगाव तालुका ग्रामीण काँग्रेसतर्फे मास्क वाटप

जळगाव, प्रतिनिधी । शहरात आज विविध ठिकाणी जळगाव तालुका ग्रामीण काँग्रेसतर्फे विना मास्क फिरणाऱ्यांना व भिक्षा मांगणाऱ्यांना तसेच इतर नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले आहे. 

शहरातील बी जे मार्केट, पांडे चौक, बेंडाळे चौक, गांधी मार्केट, नेहरू चौक, टॉवर चौक, सुभाष चौक व रेल्वे स्टेशन अशा विविध ठिकाणी मास्क वाटप करण्यात आले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, प्रमोद घुगे, भाऊसाहेब सोनवणे, सचिन माळी व पदाधिकारी उपस्थित होते. 

Protected Content