जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांचेतर्फे 6 मे, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता यशोदया मल्टीपर्पज हॉल, रिंगरोड, जळगाव येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी दिली आहे.
या शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आमदार एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकसभा सदस्य, विधानपरिषद व विधानसभा सदस्य हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
युवक/युवतीसाठी इ 10 वी व 12 वी नंतर काय? याकरीता व्यक्तीमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करणे, नविन तंत्रज्ञान आधारीत प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी आदिंबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थी, बेरोजगार युवक व पालक यांच्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी, बेरोजगार युवक व पालक यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.