चोरटी वृक्षतोड व अवैध अतिक्रमणे थांबविण्याबाबत वनविभागाची बैठक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल पुर्व वनपरिक्षेत्र विभागाच्या कार्यालयात वन्यजीवचे सप्ताहाचे औचित्य साधुन यावल व रावेर तालुक्यातील प्रादेशिक क्षेत्रातील वनविभाग जळगांव चे सातपुडा जंगलातील झाडांची चोरटी तोड, अवैध अतिक्रमण रोखण्यासाठी तसेच वनवणवा रोखण्यासाठी आणि लागलेला वनवा विझविण्यासाठी वन विभागाच्या वतीने ९० वन मजुरांचे पथके तयार करण्यात आलेले आहेत या संदर्भात वरिष्ठांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्वाची बैठक घेण्यात आली.

 

वनविभागाचे पथके हे सातपुडा वन विभागातील कार्यक्षेत्रातील मौजे मनुदेवी, वाघझिरा, आंबापाणी, निंबादेवी, नागादेवी, जामुनझिरा, हरिपुरा, आसराबारी, चारमळी, रुईखेडा, मोहमांडली, तिड्या, अंधारमळी,  डोंगरदे, जानोरी, निमड्या, गारखेडा, पाल, गारबर्डी, मोहरव्हाल, जिन्सी, पाडल्या बु, लालमाती, सहस्रलिंग, कुसुंबा, लोहरा, चिचाटी असे वेगवेगळे ठिकाणी नियमित जंगल गस्ती कामी वन कर्मचारी यांचे पथके तैनात करण्यात आलेले आहे.

 

जंगलात आग लावणारे गुन्हेगार पकडणारे, शोधुन आणणारे, त्याबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तिस  वनविभागाच्या माध्यमातुन  दहा हजाराची रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात येणार असुन, हा इनाम गुपीत पद्धतीने दिला जाणार आहे.  वन वणव्यामुळे जंगलाचे मोठे  नुकसान होते. त्यामुळे जंगलात व जंगलाचे शेजारी राहत असलेले सर्व जनतेला वनविभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की जंगलात आग लावू नका, आग लागलेली दिसल्यास व आगीची माहिती मिळाल्यास तात्काळ वन कर्मचारी यांना कळवा अथवा टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क करावे तसेच वनवा विझविण्यासाठी वन कर्मचारी यांना सहकार्य करावे.

 

जर जंगलात आगी लावण्याचे थांबले नाही तर जंगलाचे होणारे नुकसान पहाता जंगलातून डिंक, इतर वनोपज गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतींना दिलेला परवाना रद्द करण्यात येईल, असे यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक  जमीर शेख यांनी असा ईशारा ही दिला आहे. वनरक्षणासाठी तसेच वृक्षाची तोड करू पाहणाऱ्या वनगुन्हेगारांची कुठल्याही परिस्थितीत हयगय केली जाणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

 

यावल येथील पुर्व वन विभागाच्या कार्यालयातील सभागृहात कार्यक्रमात सदरील वन कर्मचारी यांना वन विभागाचे टी शर्ट, पॅन्ट, टोपी, शुज, पाणी बोटल असे साहित्याचे वाटप करण्यात आले. सदरचा  कार्यक्रम  डिगंबर पगार वनसंरक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाने  घेण्यात आला. या कार्यक्रमात जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव, प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल,  विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व, सुनील भिलावे वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम,अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, रविंद्र तायडे  वनपाल डोंगरकठोरा,वनरक्षक  प्रकाश बारेला,  भैय्यासाहेब गायकवाड यांचे उपस्थितीत कार्यक्रम झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांनी केले.

Protected Content