ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा… अन्यथा मंत्रालयावर मोर्चा

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची बैठक जामनेर शहरात घेण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या शासनान त्वरीत मान्य कराव्यात अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

 

जामनेर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी चर्चा करण्यात आली. यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून नियुक्ती करावी, वेळेवर वेतन मिळावा यांच्यासह विविध मागण्या शासन स्तरावर वेळोवेळी निवेदन देण्यात आले. दुसरीकडे ग्रामपंचायत कर्मचारी हा गावातील सर्व कामे करीत असून मात्र त्यांच्या मागण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढू असा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीला ग्रामपंचायत कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, तालुकाध्यक्ष राजू चौधरी, विजय चव्हाण,  फिरोज खान, बशीर खान, शिवाजी चौधरी, पुरुषोत्तम पाटील यांच्यासह जामनेर तालुका ग्रामपंचायत संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content