चोपडा येथे लाल बावटा शेतमजूर युनियनतर्फे महिलांचा सन्मान

चोपडा प्रतिनिधी । लाल बावटा शेतमजूर युनियनतर्फे महिला कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन तालुकाध्यक्ष वत्सला पाटील, शेतमजूर युनियन संघटिका हिराबाई सोनवणे, महिला फेडरेशन चोपडा शहर संघटिका छाया धनगर, ज्योती कापुरे यांचा समावेश होता.

मार्गदर्शन त्यावेळी मनोगत व्यक्त करताना छाया धनगर म्हणाल्या की” जागतिक महिला दिवस दिवस आम्हा महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस असून महिलांचे हक्क आणि आणि त्यांची क्षमता यांची जाणीव करून देणारा आहे. महिलांनी जिजामाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकर, अंतराळवीर कल्पना चावला आद्य मुस्लिम शिक्षिका फातिमा बीबी, इंदिरा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी कॅप्टन लक्ष्मी, सहगल माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, चोपड्याच्या माजी नगराध्यक्षा गांधीवादी कै डॉक्टर सुशिलाबेन शहा यांचे कर्तृत्व पाहिले, स्त्रीया कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत फक्त त्यांच्या कर्तुत्वाला संधी देण्यात आली आले पाहिजे.. महिलांनी अशा कार्यक्रमांना जागतिक दिनाच्या कार्यक्रमांना धार्मिक बैठका, वडे पापडे करणे व इतर आवश्यक कामे बाजूला सारून आवर्जून यायला पाहिजे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वत्सला पाटील या होत्या. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यारपण केले कार्यक्रमाचे आयोजन शेतमजूर संघटनेतर्फे करण्यात आले संघटनेचे पदाधिकारी कॉम्रेड अमृत महाजन व लक्ष्मण शिंदे यांनी महिला दिनाचा इतिहासाचे प्रस्ताविक मार्गदर्शन केले.

Protected Content