धरणगावात महिलादिनी शिवकन्यांनी केली स्मारकाची साफसफाई

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव शहरात महिला दिनाच अवचीत्य साधून शहरातील शिवकन्या भगीनींनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची साफसफाई केली आणि प्रत्येक रविवारी स्मारकाची साफसफाई करण्याचा संकल्प केला.

चेतना पाटील, नेहा जोशी, रुचिका लोहार, डॉली भंडारी या शिवकन्या भगीनींनी आजचा उपक्रम राबवला. खरोखरच या भगीनींचा खुप अभिमान वाटतोय, ज्यांनी हि खुप सकारात्मक शुरुआत केली भगिनिंच्या या शिवकार्याला मोलाची साथ ठरली ती राजे प्रतिष्ठानची,  आजच्या मोहिमेत राजे प्रतिष्ठान चे शहराध्यक्ष राजु महाजन, तालुका कार्याध्यक्ष ललित मराठे यांनी देखील हातभार लावला. तसेच धरणगांव नगरपालिकेने देखील मोलाच सहकार्य केल..

Protected Content