चोपडा येथे किराणा दुकान फोडले; पोलीसात गुन्हा दाखल

चोपडा प्रतिनिधी । शहरातील आझाद चौकातील किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून ८६ हजार रूपये किंमतीचा किराणा चोरून नेल्याचे  उघडकीला आले आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, राहूल विश्वास गुजराथी (वय-३८) रा. हुंडीवाली गल्ली चोपडा जि.जळगाव यांचे शहरातील आझाद चौकातील राहूल प्रोव्हीजन किराणा दुकान आहे. ३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता ते दुकान नेहमीप्रमाणे बंद करून घरी गेले. मध्यरात्री अज्ञातचोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दुकानातील ८६ हजार ६१० रूपये किंमतीचा किराण्याचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. हा प्रकार ४ डिसेंबर रेाजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी राहूल गुजराथी यांच्या फिर्यादीवरून चोपडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण करीत आहे.

Protected Content