चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

 

चोपडा (प्रतिनिधी) येथील विवेकानंद विद्यालयात आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील मुख्याध्यापक नरेंद्र भावे ,उपशिक्षिका सरला शिंदे ,नूतन चौधरी ,स्मृती माळी ,माधुरी हळपे, शितल पाटील ,राजेश्वरी भालेराव, विद्या सपकाळे,प्रमिला महाजन, स्मिता चंदनशिव यांच्या शुभहस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच सर्वांचे गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. इयत्ता सातवी ब च्या विद्यार्थिनींनी कोमल हे तू कमजोर नही ……हे गीत सादर केले.

 

उपशिक्षिका स्मृती माळी यांनी महिला दिनानिमित्त एकदा एका मुलीने तक्रार केली बापाकडे….. ही कविता सादर केली. इयत्ता सातवी अ ची विद्यार्थिनी आस्था साळुंखे हिने छानशी गोष्ट सांगितली.इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीने स्वयंपूर्ण तू …..गीत सादर केले. इयत्ता सहावी ब च्या ऋतुजा महाजन, रितिका महाजन यांनी महिला दिनाच्या कविता सादर केल्या.इयत्ता आठवी अ ची विद्यार्थिनी मानसी सोनार हिने कविता सादर केली ती अशी घरातील बोलका पान म्हणजे लेक,घरातील आनंदाचं वातावरण म्हणजे लेक,मोठ्या भावाच्या खोड्या काढणारी खोडकर बहिण म्हणजे लेक, आजीच्या मांडीवर गोष्ट ऐकून झोपणारी झोपाळू नात म्हणजे लेक, आई-बाबांच्या हृदयातील काळीज म्हणजे लेक, बाबा औषधी घेतल्या की नाही? असे विचारणारी ही लेक, आई काम उरकून लेटल्यावर दमलीस का ग ??विचारणारी ही लेक, लग्न झाल्यावर आई-बाबांना त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगणारी ही लेक, आई-वडिलांना कन्यादानाचा भाग्य मिळवून देणारी ही लेक,तर लेक म्हणजे घरातील प्रेम, लेक म्हणजे घरातील ऐश्वर्य तर लेकीला जोपासा, लेकीला वाढवा, अशी सुंदर कवीता सादर केली.

 

विद्यालयाच्या उपशिक्षिका शितल पाटील यांनी महिला दिनाचे महत्त्व साध्या-सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना सांगितले. मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी महिला दिनावर आपलं मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार इयत्ता आठवी ब च्या विद्यार्थ्यांनी तन्वी पाटील ,मोहिनी पाटील यांनी केले तर फलक लेखन कलाशिक्षक राकेश विसपुते व छायाचित्रण उपशिक्षक आनंद पाटील यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद ,विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content