चोपडा प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या विविध विषय समितीच्या सदस्यांची एकमताने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
चोपडा नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित सभेस अध्यक्ष सौ.मनिषा जीवन चौधरी, गटनेता चोपडा विकास मंच जीवन ओंकार चौधरी तसेच शिवसेना गटनेता महेश बाबुराव पवार, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांचेसह एकूण 24 सन्माननीय नगरसेवक सभेस उपस्थित होते. पिठासीन अधिकारी साो., यांनी प्रस्तुत विशेष सभेस उक्त नमुदपणे गणपुर्ती झाल्याने विशेष सभा कामकाज सुरु करण्याचे निर्देश दिले व त्याअनुषंगाने विषय सुचीनुसार सभा कामकाजास सुरुवात झाली.
तद्नंतर दोन्ही गट नेत्यांनी स्थायी समिती व विषय समित्यांच्या सदस्यांचे नामनिर्देशन करणेकामी प्रस्ताव पिठासीन अधिकारी यांचेकडेस सादर केले. त्यानुसार पुढील प्रमाणे स्थायी समिती व विषय समिती निहाय सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम समितीसाठी, चोपडा विकास मंच तर्फे रमेश शिंदे, जिवन चौधरी, हितेंद्र देशमुख, हुसेनखा पठाण, अशोक बाविस्कर, कैलास सोनवणे, नसिमबाना जहागिरदार व शिवसेना गटाकडून किशोर चौधरी, मनिषा जैस्वाल, शिक्षण समिती व विद्दयुत समितीसाठी चोपडा विकास मंच तर्फे काजी रुखसाना, सिमा श्रावगी, सरला शिरसाठ, सुरेखा माळी, राजेंद्र गुजर, कृष्णा पवार, नसिमबानो जहागिरदार व शिवसेना गटातर्फे किशोर चौधरी, मनिषा जैस्वाल, स्वच्छता, वैद्दक व सार्वजनिक आरोग्य समितीसाठी चोपडा विकास मंच तर्फे सुप्रिया सनेर, जिवन चौधरी, नारायण बोरोले, कैलास सोनवणे, कृष्णा पवार, सिमा श्रावगी, नुरअफजाबेगम सैय्यद व शिवसेना गटातर्फे मनिषा जैस्वाल, किशोर चौधरी, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समितीसाठी चोपडा विकास मंच तर्फे गजेंद्र जायसवाल, जिवन चौधरी, नारायण बोरोले, अशोक बाविस्कर, शोभाबाई देशमुख, विमलबाई साळुंखे, काजी रुखसाना सैय्यद व शिवसेना गटातर्फे किशोर चौधरी, लताबाई पाटील.
महिला व बालकल्याण समितीसाठी चोपडा विकास मंच तर्फे दिपाली चौधरी, शोभाबाई देशमुख, सरला शिरसाठ, सुरेखा माळी, कृष्णा पवार, विमलबाई साळुंखे, नुरअफजाबेगम सैय्यद व शिवसेना गटातर्फे मनिषा जैस्वाल, लताबाई पाटील, नियोजन विकास समितीसाठी चोपडा विकास मंच तर्फे भुपेंद्र गुजराथी, जिवन चौधरी, अशोक बाविस्कर, नारायण बोरोले, कैलास सोनवणे, विमलबाई साळुंखे, नसिमबानो जहागिरदार व शिवसेना गटातर्फे किशोर चौधरी, महेश पवार तसेच स्थायी समितीसाठी चोपडा विकास मंच तर्फे हितेंद्र देशमुख, हुसेनखा पठाण व शिवसेना गटातर्फे महेश पवार, उक्त सर्व सदस्य नगरपरिषद चोपडा स्थायी समिती व विषय समिती निहाय नामनिर्देशन करणेत आले. तसेच नगरपरिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे सभापती असतील व उपाध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे पदसिध्द सभापती असतील असे घोषीत करुन सभेचे कामकाज संपल्याचे पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार, चोपडा यांनी जाहिर केले.