जळगाव प्रतिनिधी । घरासमोरील गेटवर उभ्या असलेल्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गडीवर आलेले दोन तरूणांनी गळातील ६६ हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्राला झटका देवून लंपास केल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अनिता चंद्रकांत बेंडाळे (वय-५२) रा. भुषण कॉलनी, हनुमान मंदीराजवळ ह्या आज सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर राहणारे लिना भुषण झोपे यांच्याशी लोखंडी गेटजवळ उभे राहून गप्पा मारत असतांना दोन अज्ञात व्यक्ती (वय अंदाजे ३० ते ३५ दरम्यान) काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवर आले यांनी अनिता बेंडाळे यांच्या हातात चिठ्ठी देवून पत्ता विचारला. त्यावेळी एकजण पुढे दुचाकी सुरू ठेवून उभा होता. दिलेली चिठ्ठी उघडून पत्ता वाचत असतांना गाडीवरील दोन्ही तरूणांपैकी एकाने पेन्डल असलेली गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे ६६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हातात पकडून जोराचा झटका मारून मंगळसुत्र तोडून चोरून दोघांनी दुचाकीवरून फरार झाले. याप्रकरणी अनिता बेंडाळे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास एपीआय राजेश शिंदे करीत आहे.