चैतन्य तांडा येथे महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप

 

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चैतन्य तांडा क्र.४ येथे ग्रामपंचायतीच्या ग्राम निधीतून महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करून  ग्रामपंचायतीच्या कार्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला.

 

ग्रामपंचायतीच्या ग्राम निधीतून दहा टक्के रक्कम खर्च करण्यात येणार असून याच खर्चातून महिलांना आज  सॅनिटरी पॅडचे वाटत ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ८ वाजता करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षा  शिक्षिका संगीता जुलालसिंग राठोड (बदलापूर) होत्या  महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी मार्गदर्शन सरपंच अनिता राठोड यांनी केले. यावेळी अंगणवाडी सेविका शोभाबाई राठोड , मदतनीस उषा पवार, आशा सेविका कविता जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिता चव्हाण, गीता राठोड, यशोदा चव्हाण,  गिल्लीबाई पवार, शनोबाई पवार, सुशीला राठोड, मुक्ता राठोड, जागृती राठोड, वत्सला चव्हाण व ताईबाई राठोड आदी उपस्थित होत्या.

 

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी  आनंद राठोड, वसंत राठोड, प्रवीण चव्हाण, माजी वि. का. स.  सोसायटी चेअरमन दिनकर राठोड, संदीप पवार, गोरख गोपने, जुलाल चव्हाण, संदीप पवार व प्रवीण राठोड यांनी प्रयत्न केले. गावातील महिलांचे सातबारा व  नमुना नंबर ८ वर नाव जोडले जाईल. असे सरपंच अनिता राठोड यांनी सांगितले .

Protected Content