चुंचाळे येथे कोरोना लसीकरणास प्रारंभ : ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यावल,  प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य प्रशासनाकडुन तालुक्यात व जिल्ह्यात टप्प्यात लस उपलब्ध होत असल्याने पुन्हा ४५ वर्षावरील नागरीकांच्या कोरोना लसीकरणास मोहीमेस गती मिळताना दिसत आहे. आज यावल तालुक्यातील चुंचाळे येथे लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. 

 

 तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे व साकळी ग्रामीण प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील चुंचाळे येथे कोरोना लसीकरणास आज शनिवार दि. १२ जून  रोजी प्रारंभ करण्यात आला.  ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक कोवीशील्ड लसीचे डोस देण्यात आले. स्पाँट रजिस्ट्रेशन आरोग्य सेविका मालती चौधरी यांनी केले. लसीकरण शुभारंभ चुंचाळेच्या उपसरपंच नजिमा तडवी यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी ग्रामपंचायत सदस्य  शारदा सुधीर चौधरी ,सूकलाल राजपूत , रहिमान तडवी, संजय तडवी, रोजगार सेवक दीपक कोळी, संगणक परिचालक सुधाकर कोळी, ग्रामपंचायत शिपाई मनिष पाटील आदी उपस्थित होते. या लसीकरण मोहीमेत लसीकरणाचा दुसरा डोस असलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. एकुण १२६ लाभार्थ्यांनी कोवीडशिल्डची लस घेतली. लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करुन ते जतन करुन ठेवावे असे आरोग्य सेवक सदिप शिदे यांनी नागरीकांना सांगितले तर लस घेतल्यानंतर देखील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक शासन  नियमित मास्क  वापरावा व सामाजिक अंतर ठेवावे असे आवहान सामुदायिक आरोग्य अधिकारी अमोल अहीरे यांनी केले. या शिबिरास आशा स्वयम सेविका जयश्री चौधरी, सलीमा तडवी, बोराळे आशा वर्कर सुनयना राजपूत, आरोग्य सेवीका मदतनिस कवीता कोळी व ग्रामपंचायत यांचे विशेष सहकार्य लाभले

 

Protected Content