यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरूध्दा उपसरपंचासह सदस्यांनी अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला होता. यावर १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत सरपंच अपात्र करण्यासंदर्भात निर्णय होणार आहे.
यावल तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरुद्ध सदस्य व उपसरपंच यांनी अविश्वास प्रस्ताव येथील यावल तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दाखल केला होता. यासंदर्भात ७ जुन रोजी चुंचाळे ग्रामपंचायतीत विशेष सभा बोलवून सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव हा पारित झाला होता. तेव्हा लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानंतर सदर अविश्वास प्रस्ताव हा ग्रामसभेतून देखील संमत होणे आवश्यक असते असा नियम आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना या संदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. गावात येत्या १८ ऑक्टोंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलावुन अविश्वास संर्दभात मतदान केले जाणार आहे. या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी व पिठासन अधिकारी म्हणुन कृषी अधिकारी पी.टी. देवराज हे राहणार आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून अविश्वास प्रस्तावावर मतदान होवून नागरीक सरपंच या पदावर राहतीला का नाही हे ठरविले जाईल. तालुक्यात लोकनियुक्त सरपंच यांच्याविरुद्ध अशाप्रकारे अविश्वास झाल्यानंतर ग्रामसभेतून अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासंदर्भातील ही प्रथमच कार्यवाही असून याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.