चुंचाळेकरांना लागले ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध !

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येत्या नजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत जिल्हा परिषद ,पंचायत समिती व  आज पासुन चुंचाळे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीस सुरूवात झाली असल्याने या सर्वच निवडणुकांची रणधुमाळी पाहता चुंचाळेकरांना येणाऱ्या  निवडणुकांचे चांगलेच वेध लागले असल्याचे दिसून येत आहे.   या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील गाव कट्ट्यांवर राजकीय चर्चा रंगू लागलेले आहे.

 

ग्रामपंचायत  निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर चुंचाळ्याचे राजकारण चांगले ढवळून निघणार आहे तर गावातील सध्याची राजकीय स्थिती पाहता येत्या सर्वच निवडणुका अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावल तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतील विद्यमान सरपंच व त्यांच्या कारभारी सहकाऱ्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे.  यामुळे चुंचाळ्यात निवडणुकीचे वारे वाहु लागल्याचे चित्र दिसून येत आहे.  त्या पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकांची निवडणूक यंत्रणेकडून तयारी सुरू झालेली असल्याचे समजते.  चुंचाळे ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील व सदस्य यांचा पदाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा येणाऱ्या भावी लोकनियुक्त सरपंच व निवडणूकीच्या  कार्यक्रमाकडे लागलेला आहे. त्याचप्रमाणे येत्या डिसेंबर – २०२२ या महिन्यात चुंचाळे ग्रामपंचायतचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने ग्रामपंचायतीच्या हंगामी पंचवार्षिक निवडणुका सुद्धा  प्रस्तावित असणार आहे. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात राजकीय गोंधळामुळे लोकनियुक्त सरपंचपदासाठी दोन वेळा निवडणुका झाल्यात असे असतांना मात्र चुंचाळे ग्रामपंचायतीच्या मावळत्या सरपंचाकडून विकास कामांच्या नुसत्या गप्पा मारल्या गेल्याची चर्चा गावकरी करू लागले आहे .

 

गावात निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने गावातील राजकारण सुद्धा ऐन थंडीच्या दिवसात चांगलेच तापायला सुरुवात झालेली आहे. गावातील प्रस्थापित गट व विरोधी गट हे निवडणुकीच्या तयारीला लागलेले असून त्यांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. अजून काही नवीन घडामोडी घडतात का? हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. गावातील आजी- माजी लोकप्रतिनिधी व राजकीय मंडळी वेगवेगळया मार्गाने मतदारांची संपर्क वाढवित असल्याचे दिसून येत आहे.

निवडणुकीत विकासाचा मुद्दा- येत्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विकासाचा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. गावाचा सर्वांगीण विकास किती झाला? व होणाऱ्या विकास कामांना अडथळा निर्माण करून विकास कामांना कुणी अडथळा दिला या मुद्द्यावरच निवडणुका गाजणार आहे. कारण  आतापर्यंतच्या निवडणुका पाहता गावाच्या विकासावरच लढल्या गेलेल्या आहे.

 

इच्छुकांची भाऊगर्दी- मागील झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुक चुंचाळे गाव जिल्हासह तालुका भरात लक्षवेधी ठरले आहे.याला कारणही तसेच आहे.निवडणुकीच्या काळात चुंचाळे गावातील राजकारण अतिशय शिगेला पोहोचते. आता येत्या सर्वच निवडणुकांच्या  धुराळ्यात गावातील राजकारण हे हिमालयाचे टोक गाठणार हे राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे.या निवडणुकीत नविन चेहऱ्यांना सुज्ञ नागरिकांची पसंती असणार असल्याने नवीन चेहरे चांगलेच सक्रिय दिसून येत आहे  या निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. एकूणच येणारी ग्रामपंचायतच्या निवडणुका रंगतदार व सर्वच स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

Protected Content