चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा करा; शिवतेज प्रतिष्ठानची मागणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरात चिमुकलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार २७ नोव्हेबर रोजी उघडकीला आला होता. याप्रकरणात अटक केलेल्या नराधमाला शिक्षा होण्यासाठी खटला जलद न्यायालयात दाखल करावा आणि ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्त करावी अशी मागणी शहरातील शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी ३ डिसेंबर रोजी जिल्हा रूग्णालयात केली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका भागात राहणारी ४ वर्षीय चिमुकलीवर २७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता निर्जळ ठिकाणी नेवून तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या गुन्ह्यातील संशयित आरोपी आनंदसिंग सावळाराम भानुदास शिंदे (वय-२७) रा. लोंढरे ता.नांदगाव, जि.नाशिक याला अटक केली आहे. या घटनेत पीडीत मुलीला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी शहरातील श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावर पदाधिकारी म्हणाले की, समाजाला अशा घातक असणाऱ्या विकृत नराधमास लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी जलद न्यायालयात खटला चालवावा, सदर खटला चालविण्यासाठी ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून चिमुरडीला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणीचे निवेदन श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा रूग्णालयात शुक्रवारी ३ डिसेंबर रोजी पदाधिकारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या निवेदनावर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक राजेंद्र नन्नवरे, सर्वज्ञ बहुद्देशीय संस्थाचे सुचित्रा महाजन, शिव प्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख गजानन माळी, समाधान पाटील, दीपक दाभाडे, पप्पु जगताप, गोपाल सोनवणे, युवराज महाजन, आकाश फडे, सागर सैंदाणे, शैलेंद्र ठाकूर, रोहन महाजन यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/585438759381067

 

Protected Content