चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचे कशाला, अन् त्यांना लटकायचे कशाला ?

मुंबई प्रतिनिधी । चीनकडून घेतलेल्या रॅपीड टेस्ट किट खराब निघाल्यावरून केंद्र सरकारवर टीका करतांना शिवसेनेने ‘चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचे कशाला आणि त्यांचा लटकायचे कशाला ?’ असा खडा सवाल उपस्थित केला आहे.

कोरोनाची चाचणी करण्यासाठी चीनकडून नुकत्याच रॅपीड टेस्ट किट मागविण्यात आल्या होत्या. मात्र या किट खराब निघाल्याने शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनाच्या संपादकीयमधून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, चिनी मालाची अवस्था ही चले तो चांद तक, नहीं तो रात तक अशीच असते. त्यामुळेच चीनकडून खरेदी केलेले लाखो रॅपिड टेस्ट कीट भंगारात टाकून देण्याची वेळ आपल्यावर आली आहे. महाराष्ट्राला केंद्राकडून ७५,००० रॅपिड टेस्टचा चिनी प्रसाद मिळाला आहे. धारावीसारख्या कोरोना हॉट स्पॉट भागात रॅपिड टेस्टचे काम सुरू झाले, पण मुंबई महापालिका प्रशासनाने या रॅपिड टेस्ट तत्काळ थांबवायला सांगितल्या. कारण चिनी माल नेहमीप्रमाणे भंगार निघाला व कोरोनाचा बाजार करून चीनने हिंदुस्थानच्या गळयात टाकावू माल मारला. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातून रॅपिड टेस्ट कीटबाबत तक्रारी येऊ लागल्या. हा सर्व गोंधळ कोरोनाबाबतची चिंता वाढवणारा आहे. या लढाईत आपण कसे गंभीर नाहीत व इतके होऊनही निर्णयात कशी एकवाक्यता नाही हे दाखवणारा हा गोंधळ आहे. ज्या चीनवर भरवसा ठेवता येत नाही व ज्या चीनने जगाला महामारीच्या संकटात ढकलले त्याच्याशी त्याच ॠव्हायरसफशी लढण्यासाठी हातमिळवणी करावी हे धक्कादायक आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, या चिनी व्यवहारामागची गोम समजून घेणे गरजेचे आहे. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकारने २ एप्रिल रोजी एक अध्यादेश काढला. राज्यांना लागणारे पीपीई कीट्स, मास्क, टेस्टिंग कीट्स यांसारखे वैद्यकीय साहित्य हे राज्यांना केंद्र सरकारकडूनच घेण्याचे निर्बंध घालण्यात आले हे रहस्यमय आहे. जे रॅपिड टेस्टिंग कीट्स केंद्र सरकार चीनकडून ६०० रुपयांना विकत घेत आहे त्याच पद्धतीचे कोविड टेस्टिंग कीट्स छत्तीसगड सरकारने दक्षिण कोरियाकडून फक्त ३३७ रुपयांत खरेदी केले आहेत. केंद्राने आम्हीच चिनी माल पुरवू असे निर्बंध घातले नसते, तर छत्तीसगडप्रमाणे इतर राज्यांनीही चीनचा बोगस माल लाथाडून कोरियाचा स्वस्त माल घेतला असता. त्यामुळे राज्यांचे बजेटही कमी झाले असते व चाचण्याही खर्‍या झाल्या असत्या. शेवटी चिनी माल भंगारात गेल्यावर केंद्राला राज्यांना सूचना द्याव्या लागल्या की, झाले ते झाले. सध्याच्या बोगस कीट्सऐवजी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने बनवलेले कीट्स वापरा! म्हणजे मेक इन आणि मेड इन इंडियाचा स्वदेशी माल असताना आपण चिनी वटवाघळांशी व्यापार करू लागलो. चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचे कशाला आणि त्यांना लटकायचे कशाला? हा प्रश्‍न या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content