सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील ३८ वर्षांची परंपरा असलेली खानापूर येथून निघणारी वै. दिगंबर महाराज पायी वारी चिनावल येथे आगमन झाले असता विठ्ठल नाम घोष व टाळ मृदंगच्या निनादात अध्यात्मिक व उत्साही वातावरणात दिंडीचे चिनावल येथे जोरदार स्वागत केले.
आज खानापूर येथील श्रीराम मंदिर , विठ्ठल मदीरातून सकाळी हभप दुर्गादास महाराज नेहेते यांच्या नेतृत्वात पायी वारी निघाली. ही वारी रावेर, विवरा मार्ग आजच्या पहिल्या मुक्कामासाठी चिनावल येथे पोहोचली. हभप लिलाधर देवाजी कोल्हे व नवयुवक मित्र मंडळ चिचवाडा येथे ह्या दिंडीचा मुक्काम आहे. दिंडी चिनावल येथे पोहचताच सडा, रांगोळ्या व फुलांच्या वर्षावात गावकऱ्यांनी जोरदार स्वागत करीत टाळ मृदंग व विठ्ठल नामघोष पावली टाकत मिरवणुकीद्वारे लिलाधर कोल्हे यांच्याकडे आली. वै हभप अरुण महाराज बोरखेडेकर यांच्या नेतृत्वात सलग सुरू झालेल्या या वारीचे त्यांच्या पश्चात ही वै दिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण प्रसारक समिती रावेर यावल तालुकाच्या तसेच खानापूर ग्रामस्थ, परिसरातील टाळकरी, वारकरी ,गायक संत मंडळी च्या सहकार्याने हभप दुर्गादास महाराज नेहेते ( खिर्डी ) यांचे कडे ही धुरा देत यंदा चे हे ३८ वे वर्ष आहे.
तब्बल २३ मुक्काम असणारी ही पायी वारी दर मुक्कामाला रात्री हरिपाठ, किर्तन करीत व दिवसा टाळ मृदंग व हरि नाम घोषात मार्गक्रमण करणार आहे. दि. ३ जुलैला पंढरपूर येथे वै दिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक वारकरी शिक्षण प्रसारक समितीच्या रावेर यावल तालुक्याच्या पंढरपूर स्थीत वै दिगंबर महाराज वारकरी मठात ह्या दिंडी चा मुक्काम आषाढी एकादशीपर्यंत या दिंडीचा मुक्काम असेल या मठात आषाढी वारीनिमित्त दररोज हरिपाठ, किर्तन व महाप्रसादाचे आयोजन असते. शेकडो वारकऱ्यांचा मेळा येथे जमून विठू राया च्या दर्शना सोबतच विठ्ठल नामाचा रंगणार आहे.
गेल्या २ वर्षांपासून कोरोना महामारी मुळे ही पायी वारी प्रातिनिधिक स्वरूपात पार पडली होती मात्र यंदा मोकळ्या वातावरणात वारकरी भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे तर पायी दिंडी साठी जागोजागी अन्न दात्याकडून अन्नदान होणार आहे व सर्व सोयी सुविधा पण दानशूर मंडळी करणार आहे या पायी दिंडी ला वै दिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण प्रसारक समिती रावेर यावल तालुका यांचे सर्वोतोपरी सहकार्य लाभणार आहे.