रावेर तालुक्यातील घरकुल योजनेला गती द्या; गटविकास अधिकारी यांचे निर्देश

रावेर प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीत आज घरकुल संदर्भात गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यात तालुक्यातील घरकुल योजनेच्या कामाला गती देण्याचे निर्देश गटविकास अधिकारी यांनी दिले आहे.

 

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गरीबांचे घरकुले पूर्ण करा गरज पडल्यास गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष जावून लाभार्थ्यांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने रावेर पंचायत समितीत आज घरकुल योजना संदर्भात महत्वाची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील ग्रामसेवकांकडून कामांचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी विस्तार अधिकारी डी.एस. सोनवणे व श्री सधांशु आदी अधिकारी उपस्थित होते.

घरकुले पूर्ण करण्यात प्रशासनाची दिरंगाई
रावेर तालुक्यात विविध योजनांची घरकुले पूर्ण करण्यात दिरंगाई दिसून येत आहे. विभागीय आयुक्तानी जळगाव दौऱ्यावर येवून सूचना देवूनही गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांना घरकुले पूर्ण करून घेण्यात फारसे यश येतांना दिसत नाही. मागील पाच वर्षा पासुनची घरकुले तालुक्यात प्रलंबित आहे. घरकुले पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत तीन बैठका झाल्या परंतु काहीही उपयोग झाला नाही. गटविकास अधिकाऱ्यांच्या सुचनेला ग्रामसेवक फारसे गांभर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.

२०१६ पासुनचे ५६६ घरकुले अपूर्ण
रावेर तालुक्यात २०१६ पासून घरकुले अपूर्ण आहे .यात पंतप्रधान आवास योजनेचे २७१, रमाई घरकुल योजना २५९ तर शबरी घरकुल योजनेचे ३६ लाभार्थी असून एकूण ५६६ घरकुले विविध योजनेचे रावेर तालुक्यात अपूर्ण आहे. हे घरकुल योजना पुर्ण करण्यासाठी गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी कसरत करावी लागणार आहे.

Protected Content