सावदा ता.रावेर (प्रतिनिधी)। गेल्या अनेक दिवसांपासून चिनावल-कुंभारखेडा हा रस्ता पुर्णपणे खराब झाला होता. जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालविण्याची कसरत होत होती. राष्ट्रवादी काँग्रेसने रस्ता दुरूस्ती करावा अशी मागणी केली होती. अखेर या रस्त्यांच्या दुरूस्तीच्या कामास सुरूवात झाली आहे. यामुळे वाहनचालकांसह नागरीकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
चिनावल कुंभारखेडा हा रस्ता खूप मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता. रस्त्यात जागोजागी खड्डे पडले होते, वाहन चालवणे डोकेदुखी ठरत होते, वाघोदा, चिनावल, कुंभारखेडा या गावांना जोडणारा एकमेव रस्ता हा दुवा आहे. या परिसरात केळीची मोठी बाजारपेठ आहे. या परिसरात ट्रक केळीची वाहतूक बाहेर राज्यात याचे मुख्य रस्त्याने मोठ्या प्रमाणात जड वाहनांनी केली शेतकरी, बैलगाडी, ट्रक्टर, रिक्षांसह मोटारसायकल यांनी नेहमीच रहदारी असते, तसेच आताचं पावसाळ्याचीही सुरूवात झाली असून, यामुळे सर्व सामान्य जनतेला या नादुरुस्त रस्त्यामुळे जाणे येणे खुप जिकिरीचे होते. रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू झाल्याने तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी संवेदनशीलता दाखवून, तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानं कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादीचे विलास ताठे यांच्या मागणीला यश आले, त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
रस्त्याच्या कामांना जरी मंजूरी मिळाली तरी वर्कऑर्डरसाठी खूपवेळ घेतला. यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलास ताठे यांनी पाठपूरावा केला. अखेर या रस्त्यांच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात झाल्याने वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहेत.