मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत आणखी एका पोलीस अधिकारी कोरोना पॉझेटिव्ह असल्याचे उघड झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने पोलीस अधिकारी रहात असलेली इमारत सील केली आहे.
आर.ए.किवडाई मार्ग पोलिस वसाहतीत राहणारा हा सहाय्यक पोलिस निरीक्षक एसबी वनमध्ये कार्यरत होता. त्याला दोन दिवसांपासून सर्दी व ताप येत होता त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी के.ई.एम रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यांनतर त्या अधिकाऱ्याला उपचारासाठी अंधेरीच्या सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालिकेने पोलीस लाईन परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जंतूनाशक फवारणी आदी गोष्टींची अंमलबजावणी केली आहे.