छगन भुजबळांकडून राज्यपालांची कानउघाडणी

 

नाशिक : वृत्तसंस्था ।  काही महिन्यांपासून राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अंतर निर्माण झालंय. राज्यपालांचा मान आहे, तसाच मान मंत्रिमंडळाचादेखील आहे. राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहीजे. एका हाताने टाळी वाजत नाही,” अशा शब्दात अन्न आणि नागरी पुरवठामंत्री    छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कानऊघडणी केली.

 

 

 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ११ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं होतं.आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं होतं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली होती. नंतर महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका झाली. याच टीकेला प्रत्युत्तर देताना भुजबळ यांनी वरील वक्तव्य केले.

 

 

मंत्रिमंडळाने दिलेल्या १२ विधानपरिषदेच्या आमदारांच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेला  नाही,” असे भुजबळ म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी राज्यपाल आणि राष्ट्रपती या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले “ मी १९८५ पासून विधानमंडळात आहे. मात्र, असे कधीही घडलेलं मला आठवत नाही. मुख्यमंत्र्यानी नाव पाठवल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमदारांच्या नावावर सही व्हायची. अटलजींच्या, शिवसेनेच्या काळातदेखील असंच होतं. १९९५  साली काँग्रेसप्रणित राज्यपाल होते. त्यावेळी अचानक सरकार बदललं. मात्र तरी सुद्धा राज्यपालांनी तत्काळ त्यावर सही केली. त्यामुळे राज्यात कोण जास्त राजकारण खेळतंय हे पाहणं गरजेचं आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी राजकारण करू नये असा शिरस्ता आहे.”

 

Protected Content