चिंताजनक : मालेगावात कोरोना बाधितांची संख्या शंभरीपार

मालेगाव (वृत्तसंस्था) मालेगावमध्ये पहिले ५ रुग्ण ८ एप्रिला आढळले होते. पण आज (२३ एप्रिल) रोजी कोरोना रुग्णांचा हा आकडा शंभरी पार गेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य यंत्रणा अधिकच्या सतर्क झाल्या आहेत.

 

आज दुपारपर्यंत मालेगावात १०१ कोरोना रुग्ण आढळले असून त्यापैकी १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मालेगाव शहरतील मोमीनपुरा, कमालपुरा, नयापुरा, बेलबाग या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाकडू हे विभाग सील करण्यात आले आहेत. मालेगावमध्ये आतापर्यंत ३६५ जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. यामधील २३० अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या अहवालात ९६ जणांना कोरोनाची लागण झाली असून १३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, मालेगावमधील प्रादुर्भाव रोखण्यासाठी तेथील जिल्हा प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे.

Protected Content