चिंताजनक : देशातील एकूण मृतांचा आकडा २८ हजारच्या पार !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील एकूण रुग्णांची संख्या आता ११ लाख ५५ हजारहून अधिक झाली आहे. गेल्या २४ तासांतही ३७ हजार १४० नवीन रुग्ण सापडले. तर, २४ तासांत ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला, यासह देशातील एकूण मृतांचा आकडा २८ हजार पार झाला आहे.

 

केंद्रीय आरोग्यमंत्र्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी देशभरात कोरोनाचे ३७ हजार १४८ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा वाढून ११ लाख ५५ हजार १९१ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ५८७ जणांचा मृत्यू झाला असून, देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २८ हजार ८४ झाली आहे. सद्यस्थिती देशभरात कोरोनाचे ४ लाख २ हजार ५२९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ७ लाख २४ हजार ५७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. याआधी सोमवारी तब्बल ४० हजार नवीन रुग्ण सापडले होते, त्यामुळे रुग्णांची संख्या काही अंशी कमी झाल्याचे दिसत आहे.

Protected Content