चिंताजनक : एका दिवसात सापडले ११ हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात मागील 24 तासांमध्ये सर्वाधिक 11458 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या आता तीन लाखांच्या पार पोहोचली आहे.

 

भारतात मागील 24 तासांमध्ये 386 लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. एकीकडे ही काळजी वाढवणारी आकडेवारी समोर येत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने काहीसा दिलासा मिळाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 49.94 टक्के इतका असून आतापर्यंत देशभरात 1,54,330 बरे झाले आहेत. तर देशात सलग 9व्या दिवशी 9,500 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात समूह संसर्ग झाला नसल्याचा दावा केला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४९.४७ टक्के असल्याचेही सांगितले. १ लाख ५४ हजार ३३० रुग्ण बरे झाले असून १ लाख ४५ हजार ७७९ रुग्ण उपाचाराधिन आहेत. देशात सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राने एक लाख करोनाबाधित रुग्णांची संख्या ओलांडली आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, प. बंगालमध्येही करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

Protected Content