चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील खरजई नाक्याजवळ उभी केलेली दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, प्रकाश फकिरा पाटील (रा. कनाशी ता. भडगाव) यांनी शहरातील खरजई नाक्याजवळील त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्राच्या समोर दुचाकी (एम.एच.१९ सीई ३८६३) उभी केलेली असताना अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना मंगळवार रोजी दुपारी घडली. त्यावर प्रकाश फकिरा पाटील यांनी बस स्थानक, रेल्वे स्थानकासह परिसरात शोधाशोध केली. परंतु २५ हजार रुपये किंमतीची होंडा ड्रीम योगा कंपनीची मोटारसायकल मिळून आली नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यावर चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून प्रकाश पाटील यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भुषण पाटील हे करीत आहेत.