जळगाव प्रतिनिधी । प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा चाळीसगाव येथे 16 मार्च, 2020 रोजी होणारा तालुकास्तरीय मेळावा तूर्त स्धगित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बेरोजगार व सुशिक्षित तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करणे तसेच लघुउद्योजकांना अर्थसाह्य उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत जिल्हा समन्वय समितीच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे तालुकास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले होते.
यानुसार चाळीसगाव येथील तालुकास्तरीय मेळावा 16 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व शासकीय कार्यक्रम रद्द केले आहे. त्याअनुषंगाने चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आलेला प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा तालुकास्तरीय मेळावा तूर्त स्थगित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी घेतला आहे.
याची या मेळाव्यास उपस्थित राहणा-या सुशिक्षित तरुणांनी, लघुउद्योजक, बचतगटाच्या महिला, शासकीय विभागाचे अधिकारी व नागरिकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.