चाळीसगाव प्रतिनिधी । बी. पी.आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के.के.सी.कॉमर्स महाविद्यालय वाणिज्य विभाग यांच्या वतीने कॉमर्स अँड बिझिनेस मॅनेजमेंट इन चेंजीग वर्ल्ड या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले.
जग भरातील व्यापार व व्यवस्थापन बदलत असून त्या अनुषंगाने या आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिलदीकर यांनी सांगितले.
ऑनलाईन झालेल्या या आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे उद्घाटन अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ – प्राचार्य डॉक्टर पी.पी. छाजेड , धुळे यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद बिलदिकर होते. विद्यापीठ कुलसचिव प्रा डॉ बी व्ही पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
विद्यापीठ सिनेट व अकॅडेमिक कौंसिल सदस्या पूनम गुजराती या विशेष अतिथी होत्या. उपप्राचार्य प्रा.अजय काटे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला व उपस्थितांचे स्वागत केले.वाणिज्य विभाग प्रमुख तथा निमंत्रक प्रा.के.एस खापर्डे यांनी कार्यक्रमाचे विस्तृत प्रस्ताविक केले.
या आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन तीन सत्रात करण्यात पहिल्या सत्रात नागपूर येथील शब्बीर शाकीर गव्हर्नर, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० यांनी बिसनेस ऑफ मॅन काईंड. केस ऑफ वर्ल्ड लार्जेस्ट, मोस्ट रीलायबल अँड एफेक्टिवली गवर्नेड एनजीओ या विषयावर बीज भाषण केले.
बडोदा येथील प्रा. शीवप्रकाश अग्रवाल एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (-खचड) यांनी इंटरनॅशनल अकॅडमीक नेटवर्किंग, कॉन्फरन्स प्रेजेंटेशन अँड जरनल पब्लिकेशन ऑपोरच्युनीटी या विषयावर व्याख्यान केले या सत्राचे सत्र अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. रश्मी शर्मा, भुसावळ हेड, रिसर्च सेंटर कॉमर्स अँड मनेजेमेंट यांनी केले
दुसर्या सत्रात पुणे येथील शिरीष बारपांडे, ग्लोबल हेड ऑफ सर्व्हिस ऑपरेशनस टेलिकॉम कडइउ सॉफ्टवेर देव अँड मेंबर बोर्ड ऑफ स्टडी (जळगाव विद्यापीठ) यांनी मॅनेजिंग टिम्स इन ग्लोबोलयसिंग बिझिनेस वर्ल्ड या विषयावर व युरोपियन देश स्वीडन वरून अक्षय सरोदे , रोबोटिक कल्संटंट व्हर्च्युअल मनुफॅक्चरिंग -इ स्विडेन यांनी इंडस्ट्री ४.० या विषयावर व्याख्यान दिले या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ वैशाली पाटील डायरेक्टर, आर. सी. पटेल शिरपूर यांनी काम पाहिले. तिसर्या सत्रात जर्मनी येथून अक्षय कुलकर्णी, वॉटर मॅनेजमेंट तज्ज्ञ यांनी सर्क्युलर इकॉनॉमी विषयावर व हैद्राबाद येथील डॉ. कुणाल गौरव, फाउंडर डायरेक्टर खऊचइ- हैदराबाद यांनी पब्लिशिंग इन यूजीसी केअर जरनल इन कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयावर व्याख्यान केले
या सत्राचे अध्यक्ष म्हणून व समारोप सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून बोदवड येथील प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी यांनी कार्य केले.
आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रामध्ये जर्मनी, स्वीडन,आफ्रिकन, दुबई, नेपाल येथून सदस्य नोंदविले. समारोप सत्रात उपप्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. राहुल कुलकर्णी , प्रा. पूनम निकम, प्रा. विभा पाटील, प्रा. रमेश पावरा व डॉ. श्रीकांत भंडारी यांनी कामकाज केले.
नागपूर येथील रोटरी इंटरनॅशनल च्या प्रांत सचिव तौबी भगावागर, अमळनेर येथील प्रा. योगेश तोरवणे व महाविद्यालयीन कार्यालय प्रमुख हिंमत अंदोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.