चाळीसगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा; रयत सेनेचे मागणी!

चाळीसगाव, प्रतिनिधी |  गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे चाळीसगावाला ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शासकीय मदत जाहीर करा अशी मागणी रयत सेनेने केली आहे.

 

चाळीसगाव शहरासह तालुक्यात ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे अनेकांचे जनावरे व घरे वाहून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान पंचनामे होऊन महिना उलटला तरीही शासकीय मदतीसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र सोमवारपासून मुसळधार पावसाने पुन्हा उग्र रूप धारण केले आहे. संततधार पावसामुळे शेतात काही प्रमाणात दिसून येणारे पिके हे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे संपूर्ण चाळीसगाव तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने पूरग्रस्तांना शासकीय मदत शासनाने जाहीर करावी आदी मागणी रयत सेनेने तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यातच सोमवारी पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तितूर व डोंगरी नदीला पूर आला आहे. तर काही ठिकाणी नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. निवेदनात तालुक्यातील १३७ गावांच्या जानेवारी महिन्यात ६५ पैश्यापेक्षा अधिक आणेवारी लावण्यात आली होती. हि आणेवारी महसूल प्रशासनाने कमी करून पंचणामे न करता सरसकट आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. वरील मांगण्या मान्य करण्यात आल्या नाहीत तर रयत सेना तहसील कार्यालयासमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा देण्यात आले आहे. निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष सचिन नागमोती, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष भरत नवले , विलास मराठे, खुशाल पाटील, सचिन पवार, भूषण चव्हाण, सरपंच जगन ओंकार भिल (जामडी), उपसरपंच संजीव पाटील, सरपंच रावसाहेब पाटील (आडगाव),   उपसरपंच अमोल पाटील (रोकडे), काका घोडेस्वार, गजानन चंदनशिव, छोटु अहिरे ,अभिमन्यू महाजन, विलास पाटील, मकरंद लोखंडे, संदीप मोरे, अभय पवार, गुलाब बोरसे, सुनील पाटील, जगन भिल्ल, शांतीलाल निकुंभ, काशिनाथ गवळी, रवींद्र पाटील, अंकुश पाटील, जयेश पाटील, विजय दुबे, विठ्ठल आखाडे आदींनी सह्या केल्या आहेत.

 

Protected Content