चाळीसगावात बंद घराचे कुलूप तोडून साडे चार लाख लंपास!    

 

चाळीसगाव, प्रतिनिधी : पत्नीची तब्येत अचानक बिघडल्याने नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेल्या पाच तोळा सोने व रोख रक्कम असे एकूण साडे चार लाख अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना शहरातील फुले कॉलनीत घडली असून याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

                   सविस्तर वृत्त असे की, अशोक श्रीधर येवले (वय- ६१ रा. फुले कॉलनी) ता. चाळीसगाव येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. अशोक येवले हा जमीन खरेदी विक्री एजंट म्हणून काम करतो. दि. १८ मार्च रोजी सकाळी अचानक पत्नी शारदा येवले हिच्या तब्येतीत बिघाड झाल्याने उपचारासाठी शहरातील दवाखान्यात दाखल केले. परंतु तब्येतीत सुधारणा न झाल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथील ऋषीकेश हॉस्पिटलात दि. २२ मार्च रोजी दाखल करण्यात आले. दरम्यान घराला कुलूप लावून बंदच होता. दि.२७ मार्च रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अशोक येवले यांचे मोठे भाऊ प्रकाश श्रीधर येवले यांनी अशोक येवले यांना घराचे कडी कोंडा तोडल्याची माहिती फोनद्वारे दिली. तेव्हा लगेच अशोक येवले हे आपल्या घरी येऊन पाहणी केली असता घरातील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले २२ ग्रॅमची सोन्याची पोत, १३ ग्रॅम मंगळसूत्र, १५ ग्रॅमच्या सोन्याच्या वीस पुतळ्या व ३,१५००० रू रोख रक्कम असे एकूण ४, ६३००० हजार रुपये अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे कळताच शहर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.

Protected Content