ट्रक चालकाकडून गुटखा जप्त

शेअर करा !

रावेर प्रतिनिधी । मध्यप्रदेश सीमेवर असणार्‍या नाक्याजवळ ट्रकमधून विमल गुटख्याचे पुडे घेऊन जाणार्‍या चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा ट्रक जप्त करण्यात आला आहे.

store advt

याबाबत वृत्त असे की, काल रात्री चोरवड तपासणी नाक्या जवळ पोलिसांचे पथक गस्त घालत असतांना त्यांनाएमएच १९ जे-००९५ या क्रमांकाच्या ट्रकमधील ड्रायव्हरजवळ विमल गुटख्याचे पुडे आढळून आले. या अनुषंगाने पोलीस कर्मचारी सुरेश आनंदा मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक फिरोज खान दिलावर खान (वय ३५, रा. शिकरपुरा, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) याच्या विरूध्द भाग ५ गुरनं १४७/२०२० भादंवि कलम ३२८,१८८,२७२,२७३
अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्या कडून गुटख्याचे पुडे आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील तपास डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे व उपनिरिक्षक सुनिल कदम हे करत आहेत.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!