चाळीसगावच्या सविता राजपूत नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित

चाळीसगाव, प्रतिनिधी | सामाजिक बरोबर क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नगरसेविका सविता राजपूत यांना जिल्हास्तरीय नारीशक्तीने पुरस्काराने आज रोजी सन्मानित करण्यात आले.

 

चाळीसगाव तालुक्यात नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिक्षीका तथा नगरसेविका सविता राजपूत यांना आज रोजी जिल्हास्तरीय नारीशक्तीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून सामाजिक बरोबरच क्रिडा क्षेत्रात त्या उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. याची दखल घेऊन जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रिडा शिक्षक महासंघाच्या वतीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

 

Protected Content