चार भुरट्या चोरांकडून चोरीचा माल हस्तगत

 

रावेर,  प्रतिनिधी । शहरातील रहिवाशांच्या अंगणात ठेवलेल्या सिमेंटच्या गोण्या , कुलर, लोखंडी आसऱ्या चोरून नेणाऱ्या चार भुरट्या चोरांना पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून चोरीचा १० हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .

विजय भावसार ( रा. – महालक्ष्मी मंदिराजवळ , रावेर ) यांच्या फिर्यादीवरून गणेश महाजन ( २१) , अमान छप्परबंद ( २२ ), यश हंसकर (२१), आदर्श जावे ( १६ ) या चार आरोपींविरुद्ध गु. र. न. १६८ / २० भा. द. वि कलम ३७९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता . पोलिसांनी तपास करून त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली होती.

९ सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या या चोरीतील सिमेंटच्या ९ गोण्या , विविध साईझच्या लोखंडी आसऱ्या आणि कुलर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जप्त केले . या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले . पो. नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. महेंद्र सुरवाडे , पो. कॉ . सुरेश मेढे , तुषार मोरे हे पुढील तपास करीत आहेत .

Protected Content