चोपडा, प्रतिनिधी । चहार्डी विद्या प्रसारक मंडळ चहार्डी संचलित भाऊसो शामराव शिवराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर चहार्डी या संस्थेच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित तालुकास्तरीय चित्रकला, रांगोळी, निबंध लेखन, गायन स्पर्धांमध्ये विद्यालयातील एकूण १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यापैकी सहा विद्यार्थ्यांना बक्षीस प्राप्त केले आहे.
त्यांची नावे पुढीलप्रमाणे चित्रकला – प्रथम पारितोषिक प्रेरणा गाडीलोहार, तृतीय पारितोषिक हर्षिता बडगुजर, रांगोळी स्पर्धा -द्वितीय पारितोषिक प्रतिक्षा पाटील, गायन स्पर्धा -तृतीय पारितोषिक मुग्धा शहा, निबंध स्पर्धा – प्रथम पारितोषिक पर्वणी वैद्य व तृतीय पारितोषिक लीना पाटील. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नरेंद्र भावे, कलाशिक्षक राकेश विसपुते, उपशिक्षिका माधुरी हडपे, उपशिक्षक प्रसाद वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर,उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, विश्वस्त सुधाकर केंगे, मंगला जोशी, मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्यासह सर्व विश्वस्त शिक्षक व पालक यांनी केले आहे.