यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात रसायनिक पध्दतीने बनविलेली पन्नीतील दारू व गावठी हातभट्टीची दारू खुलेआम विक्री होत आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला वर्गाकडून केली जात आहे.
यावल तालुका हा जळगाव जिल्ह्यात आदीवासी क्षेत्र म्हणुन ओळखला जातो. ८५ गावे असलेल्या या तालुक्यात मोठया प्रमाणावर राहणारे गोरगरीब नागरीक मोलमजुरी करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र मागील गेल्या दोन ते तीन वर्षापासून तालुक्यात रासायनिक पध्दतीने व विषारी घातक रसायन मिश्रण करून पन्नीची दारू तयार करण्यात येत आहे. ही दारू शहरी भागातील काही ठराविक ठीकाणी तर ग्रामीण भागात सार्वजनिक ठीकाणी खुलेआम विक्री केली जात आहे. ही दारू मानवी जिवनास धोकादायक आहे. खुलेआम विक्री होत असतांना अगदी सहजपणे मिळणाऱ्या या पन्नीच्या दारूमुळे मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलांपासून ते महाविद्यालयीन तरूण व्यसनाधिन होत आहे. या दारूच्या आहारी जात व्यसनाधिन होत असल्याने त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होवून अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. याविषारी घातक रसायनाच्या पन्नी दारूमुळे अनेक तरूणांचा दुदैवीरित्या मृत्यु झाला असुन अनेक मृत्युच्या वाटेवर आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवून खुलेआम दारूची विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी माहिती परिसरातील महिला वर्गाकडून केली जात आहे.